गणेशोत्सवानिमित्त सकाळी ९ ते १२ या वेळेत देवस्थानच्या वतीने श्रींची सहस्त्र आवर्तने, महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास उत्सवमूर्तीची पूजा करून मंदिराला प्रदक्षिणा करून उत्तरद्वार ढोक सांगवी येथील मुक्ताई देवी मंदिर या ठिकाणी फक्त विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत फुलांची आकर्षक सजावट केलेल्या चारचाकी वाहनातून प्रस्थान करण्यात आले. त्या ठिकाणी आरती व जोगवा करण्यात आला. सायंकाळी देवस्थानच्या वतीने श्रींची सहस्त्र आवर्तने, महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.
दर चतुर्थीप्रमाणे याही चतुर्थीला प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक व मनमोहक सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संतोष गवारे यांच्या वतीने श्री महागणपतीला ५०१ डाळिंबाचा महानैवेद्य देण्यात आला. रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी देवस्थानचे विश्वस्त ॲड. विजयराज दरेकर, डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, शेखर देव, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशेबनीस संतोष रणपिसे उपस्थित होते.
--
चौकट
ऐन गणेशोत्सवात कोरोनाच्या निर्बंधामुळे मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांना महागणपतीच्या दर्शनापासून मुकावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीच्या वतीने गणेशाचे ऑनलाईन दर्शन घेता येण्यासाठी शेमारो भक्ती हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे नागरिकांना लाईव्ह दर्शन घेता येणार असून भाविकांनी प्लेस स्टोअरवरून डाऊनलोड करून महागणपतीच्या आरतीचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
100921\img-20210910-wa0241.jpg
???? ???????? ???????? ??????? ?????? ? ?????? ????? ???? ?????????? ????????? ??????????