आसखेड परिसरात भरलेल्या बाजारात गुरूवारी फ्लॉवर व कोबी उत्पादकांची मोठी निराशा झाली. त्यांना योग्य भाव न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागले. मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल काहींना भावा अभावी शेतातच सोडून द्यावा लागला. काहींनी तर अवघ्या एक रुपये किलोने मेंढ्यांना खाण्यासाठी धनगरांस माल विकला. फळ आणि पालेभाज्यांचे व्यापारी लहू कोळेकर यांनी सांगितले की, खेड आणि संगमनेर येथून फ्लॉवरचा माल येतो. परंतु आजच्या मातीमोल भावामुळे शेतकरी अडचणीत आला, तर व्यापाऱ्यांना घेतलेला काही मालही घेतल्या किमतीपेक्षा कमी भावात विकावा लागला. ईश्वर राक्षे, बबन घावटे, अनिल कड हे शेतीत विविध पिकाचे प्रयोग करत असतात. परंतु फ्लॉवरच्या पिकाने तोंडास पाने पुसली, अशी खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
फोटो... फ्लॉवरचे भाव गडगल्याने फ्लॉवर सोडून द्यावा लागला व शेळ्या मेंढ्यांसाठी रुपया भावात विकावा लागला.