शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

सर्व संस्कृतीत आढळणारे बासरी हे एकमेव वाद्य

By admin | Published: December 12, 2015 12:48 AM

बासरी हे असे एकच वाद्य आहे जे जगात आणि सर्व संस्कृतीत आपल्याला आढळून येते. बासरीचे विविध प्रकार असूनही ती आजच्या सर्व संगीतप्रकारात वापरली जात आहे,

पुणे : बासरी हे असे एकच वाद्य आहे जे जगात आणि सर्व संस्कृतीत आपल्याला आढळून येते. बासरीचे विविध प्रकार असूनही ती आजच्या सर्व संगीतप्रकारात वापरली जात आहे, हे या वाद्याचे वैशिष्ट्य असल्याची भावना बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांनी व्यक्त केली. भारतीय शास्त्रीय संगीत हे हृदयातून तर कर्नाटकी संगीत हे तालावर भर देत वाजविले जाते, असे मतही त्यांनी नोंदविले. ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात होत असलेल्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी गोडखिंडी यांची मुलाखत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी घेतली. त्या वेळी ते बोलत होते.बासरीचा प्रवास समजावून सांगताना भगवान श्रीकृष्णापासून ते पं. पन्नालाल घोष आणि आता हरिप्रसाद चौरसिया यांच्याविषयीही गोडखिंडी भरभरून बोलले. पं. पन्नालाल यांनी बासरी शास्त्रीय संगीतात आणली तर हरिप्रसाद चौरसिया यांनी ती वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, असे गोडखिंडी म्हणाले. लहानपणापासूनच पं. भीमसेन जोशी यांना ऐकत आल्याने ‘नेहमी बासरीमधून गाण्याचा प्रयत्न कर’ ही आपले वडील व गुरू व्यंकटेश गोडखिंडी म्हणायचे. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट लक्षात ठेवत आजपर्यंत बासरी वाजवीत आहे, अशी आठवण सांगत प्रवीण गोडखिंडी यांनी आजपर्यंतचा आपला सर्व प्रवास वडील व्यंकटेश गोडखिंडी व भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना समर्पित केला. (प्रतिनिधी)