अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन

By राजू हिंगे | Published: August 14, 2024 01:58 PM2024-08-14T13:58:01+5:302024-08-14T13:59:24+5:30

राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून वाहनांसाठी खुला केला जाणार

Flyover finally ready Relief of Sinhagad road citizens from traffic Inauguration by Ajit Pawar at 7 am | अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन

अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन

पुणे: पावसाने उघडीप दिल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर मारला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही उदघाटन होत नसल्यामुळे टिकेची झोड उठत होती. अखेर या उड्डाणपुलाच्या उदघाटनाचा मुहूर्त ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदया म्हणजे गुरवारी सकाळी ७ वाजता या उड्डाणपुलाचे उदघाटन होणार आहे. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतुक कोंडीतुन सुटका होण्याची शक्यता आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम थिएटरदरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे. त्यामध्ये राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाची संततधार सुरू होती. खडी ओली असल्याने डांबराचा प्लँट बंद होता. पावसात ५० मि.मी.चा डांबराचा थर मारल्यास रस्ता लगेच खराब होऊन खड्डे पडू शकतात. त्यामुळे महापालिकेवर नागरिक लगेच टीकेची झोड उठवतील. त्यामुळे हे काम केले जात नाही. या उड्डाणपुलावर शनिवारी डांबरीकरण करण्यात आले. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी उड्डाणपूल सुरू झालेला नाही. या उड्डाणपुलावरून वाहतुक सुरू करावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतरही उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यावरून टिकेची झोड उठविली जात होती. अखेर अखेर या उड्डाणपुलाच्या उदघाटनाचा मुहूर्त ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदया सकाळी ७ वाजता या उड्डाणपुलाचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतुक कोंडीतुन सुटका होण्याची शक्यता आहे.

Web Title: Flyover finally ready Relief of Sinhagad road citizens from traffic Inauguration by Ajit Pawar at 7 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.