पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकाजवळ बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या ८ दिवसांत तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. उड्डाणपुलाखालील रस्त्याची दुरुस्ती तसेच डांबरीकरणाचे कामही युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी सांगितले. उड्डाणपूल खुला झाल्यानंतर स्वारगेट चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.लक्ष्मीनारायण चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी केली. या वेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)---------स्वारगेट परिसरातील कोंडी टाळण्यासाठी या परिसरात दुहेरी उड्डाणपूल आणि ग्रेड सेप्रेटर महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रामुख्याने जेधे चौकातील कोंडी लक्षात घेऊन या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले होते. सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आहे. महाराष्ट्र रस्ते महामंडळाकडून उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महापालिकेला दिली होती. त्यानुसार महापौर व आयुक्तांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली.
लक्ष्मीनारायण चौकातील उड्डाणपूल ८ दिवसांत वाहतुकीसाठी खुला
By admin | Published: June 10, 2015 5:25 AM