धायरी : गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे. राजारामपुल ते फनटाईम दरम्यान सकाळी व संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूककोंडीवर उड्डाणपूल हाच अखेरचा उपाय आहे. स्थानिक नगरसेवकांसह हवेली तालुका नागरी कृती समितीनेही या पुलाबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे काम गेली चार-पाच वर्षे रेंगाळले होते. अखेर नुकताच या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडून वाहतूक सुरळीत होण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावरही राजारामपुल ते फनटाईम थिएटरपर्यंत दुपदरी उड्डाणपूल झाल्यास या रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. त्यासाठी विविध नागरी संघटनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अनुकुलता दर्शवली आहे. सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. रुंदीकरण होऊनही आनंदनगर चौक, सनसिटीकडे जाणाºया चिंचोळ्या रस्त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. फनटाईम थिएटरपर्यंत सिग्नलला वाहनांची प्रचंड गर्दी असते त्यात शाळांच्या स्कूल बसेस, रुग्णवाहिका व पीएमपी बसेसही अडकून पडलेल्या असतात त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर चौक (संतोष हॉल) व ब्रह्मा गार्डन चौकात दररोज सकाळी व संध्याकाळी वाहतूककोंडी असते. उड्डाणपुल झाल्यास हा प्रश्न सुटू शकतो. तसेच धायरी उड्डाणपुलाखाली सिग्नल बसवावेत, तेथे वाहतूक पोलीस नसतात. खडकवासल्याकडून येणारी वाहने एकदम धायरीकडे वळतात, त्यामुळे अपघात होत आहेत. - चंदू कुंभार, धायरी, कर्मचारीमराठी व इंग्रजी शाळेत जाणारे लहान गटातील विद्यार्थी वेळेत घरी अथवा शाळेत पोहोचणे आवश्यक आहे. मुल घरी येईपर्यंत फार काळजी वाटते. उड्डाणपुल झाल्यास वाहतूककोंडी कमी होईल.- वैशाली चौगुले, गृहिणीमनपा हद्दीलगतच्या गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. येथून मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, पुण्यात येत असतात मात्र, सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावरच खडकवासला धरण, एनडीए, सीडब्ल्यूपीआरएस आयएटी पानशेत धरण, असे महत्त्वपूर्ण प्रकल्प व संस्था आहेत. या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. फनटाईम ते राजारामपूल हा उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल. तसेच नांदेड येथील पुलाचे कामही वेगाने करावे, अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.- श्रीरंग चव्हाण-पााटील, अध्यक्ष, हवेली तालुकानागरी कृती समिती
सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपूल हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:31 AM