पुणो : राज्यातील विद्यापीठांनी विद्याथ्र्याना सर्व पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देणो गरजेचे असून, परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्याचप्रमाणो गुणवत्ता, शिक्षण आणि संशोधन या तीन क्षेत्रंत यश मिळवत समाजाभिमुख व नावीन्यपूर्ण संशोधन करण्यावर भर द्यावा, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीवरील 11क् के.डब्ल्यू. सौरऊर्जा प्रकल्पाचे, वाणिज्य विभागाच्या नूतन इमारतीचे, विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन कार्यक्रम आणि वाय फाय नेटवर्क प्रकल्पाचे उद्घाटन सी. विद्यासागर राव याच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रसंगी राव बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही.बी. गायकवाड, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू उपस्थित होते.
‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्यात आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वीपणो राबविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन करून राव म्हणाले, ‘‘निकाल वेळेत न लागणो, पुनमरूल्यांकनाचा निकाल उशिरा जाहीर होणो, पदवी प्रमाणपत्र उशिरा मिळणो, अशा तक्रारी विद्याथ्र्याकडून येत आहेत. याकडे सर्व विद्यापीठांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेत सर्वथा बदल आणण्याची गरज असून, महाविद्यालय व विद्यापीठांच्या परिसरात गुणवत्तेची संस्कृती रुजविणो गरजेचे आहे.’’
(प्रतिनिधी)
प्रलंबित प्रश्न
लवकरच सुटतील
विद्याथ्र्याना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावे. सध्या विद्यार्थी विविध सोशल नेटवर्किगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत. आता विद्याथ्र्याना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण देण्यावर आणि त्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधन करण्यावर भर द्यावा. राज्यातील शिक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे शिक्षणातील प्रलंबित प्रश्न लवरकच सुटतील.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल
शिक्षक भरती प्रश्न सोडवावा
वासुदेव गाडे यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मात्र, गेल्या काही वर्षापासून शिक्षक भरतीप्रक्रिया बंद पडल्यामुळे विद्यापीठात शिक्षकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षक भरतीचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.