शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

लोककला विद्यापीठाला मिळेना अद्याप मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:51 PM

महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या लोककला, लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या मिलाफातून लोकसंस्कृती उभी राहिली आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : लोककलांच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी लोककला विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी चार वर्षांपूर्वी केली होती. लोककलावंतांची तसेच जाणकारांची समिती स्थापन करुन याबाबतचा अहवालही तयार करण्यात आला होता. मात्र, चार वर्षांनंतरही लोककला विद्यापीठ स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. कला केंद्र अथवा अध्यासनाच्या माध्यमातून शासन दुधाची तहान ताकावर भागवत असल्याची तीव्र नाराजी लोककलावंतांकडून  दवण्यातयेत आहे.

महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या लोककला, लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या मिलाफातून लोकसंस्कृती उभी राहिली आहे. लोककलांनी प्राचीन काळापासून लोकानुरंजनाचे, प्रबोधनाचे कार्य केले. काळ बदललला, मनोरंजनाची साधने बदलली आणि लोककला लोप पावण्याची भीती निर्माण झाली. लोककला जपल्या जाव्यात, त्यांचा विकास व्हावा, यासाठी लोककलावंत आपापल्या क्षमतेप्रमाणे झटत आहेत. मात्र, शासनाच्या माध्यमातून प्रयत्न झाल्यास आणि लोककला विद्यापीठ उभे राहिल्यास भविष्यात या कलांचे जतन आणि संवर्धन होऊ शकेल.

सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शाहीर अमर शेख जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोककला विद्यापीठाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची घोषण २०१५ साली केली होती. लोककला विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रम, योग्य व्यक्तींची नेमणूक याबाबतचा प्रस्ताव लोककलावंतांच्या समितीतर्फे सांस्कृतिक विभागाकडे सुपूर्त करण्यात आला होता. मात्र, चार वर्षे उलटून गेल्यानंतरही शासनातर्फे कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय लोककला संमेलनामध्ये संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी शासनाला याबाबतची आठवणही करुन दिली होती. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमातही याबाबतचा ठराव मांडण्यात आला.

‘लोकमत’शी बोलताना दादा पासलकर म्हणाले, ‘लोककला विद्यापीठाच्या कार्यक्रमाबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्र्यांकडे सुपूर्त करण्यात आला होता. विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी लोककलावंतांच्या समिती गठित करावी, विद्यापीठावर योग्यव्यक्तीची नेमणूक व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी किमान दहावी उत्तीर्ण अशी शिथिल अट ठेवावी. शिक्षकांची नेमणूक करताना पदवीधर किंवा डॉक्टरेटप्राप्त व्यक्ती असावी असा आग्रह न धरता प्रत्यक्ष अनुभव असलेल्या  ककलावंतांनाप्राधान्य मिळणे आवश्यक आहे. लोककला हा पुस्तकातून शिकण्याचा विषय नसून, प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे.’ 

सांस्कृतिक विभागाने लोककलांबाबत गांभीर्याने विचार करणे आणि त्यादृष्टीने कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. आमच्या मागण्यांचा केवळ गाजराच्या पुंगीसारखा वापर केला तर लोककला टिकणार कशा? महाराष्ट्रभर लोककलेचे जागरण करणा-या व्यक्ती आहेत. लोककलांचे संवर्धन व्हावे यासाठी समाजाची, शासनाची आणि माध्यमांची साथ गरजेची आहे.- शाहीर दादा पासलकरसर्व लोककला या लोकाभिमुख आहेत. त्यामुळे लोककलावंत हे लोकपीठ आहेत. त्यांचा शरीरभाव मनोरंजनाचा असला तरी, आत्मा प्रबोधनाचा आहे. लोककलावंत ही विशारद पदवी मिळाली पाहिजे. कारण, लोककला आणि मराठी भाषा यामुळे आपण नटलो आहोत. पण, आपण लोकपरंपरा विसरत आहोत. लोककलेचा आत्मा प्रबोधनाचा असल्यामुळे ती टिकविण्याचीजबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यासाठी लोककला विद्यापीठाची नितांत गरज आहे. - डॉ. रामचंद्र देखणे,संत साहित्याचे अभ्यासक