ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पवन हिले हे होते. या वेळी पुणे जिल्हा दूध संघाचे विष्णू हिंगे पाटील, उपसरपंच सचिन हिंगे, सदस्य प्रशांत वाडेकर, अजित चव्हाण, साखर कारखान्याचे संचालक शांताराम हिंगे, ग्रामस्वच्छता कमिटी अध्यक्ष अनिल हिंगे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सर्जेराव हिंगे, विद्यमान सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, गुलाब हिंगे, सुनील हिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यात मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामसभा रद्द करण्यात आल्या होत्या. शासनाने कोरोनाचे काटेकोर पालन करून ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली. दोन वर्षांत प्रथमच अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी अवसरी खुर्द व गुरुवारी अवसरी बुद्रुक येथे ग्रामसभा झाली. या वेळी सन २०२१-२२ सालाकरिता विकास आराखडा मंजूर करणे, गावठाण व वाड्या वस्त्यावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करणे, बंधाऱ्याची दुरुस्ती करणे, नविन बांधकामांची नोंद करून कर आकारणी करणे, ठरवून दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा ताब्यात असलेल्या जागांची मोजणी करून कर वसूल करणे, नवीन रेशन दुकानांना परवानगी मिळणेकरिता जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार करणे, नवीन रेशन कार्डकरिता तलाठ्यांना योग्य सूचना देणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
ग्रामसभाप्रसंगी पोलीस निरीक्षक सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवसरी पोलीस बीट जमादार गणपत डावखर, फौजदार विनोद गायकवाड यांनी बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण ग्रामसभेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले.
--
फोटो : २५अवसरी ग्रामसभा
छायाचित्र मजकूर : अवसरी बुद्रुकच्या ग्रामसभा बैठकीत उपस्थित सरपंच पवन हिले व ग्रामविकास अधिकारी दीपक शिरसाट व ग्रामस्थ.