शेरकर म्हणाले की, कोविड-१९ विषाणूपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सॅनिटायझरचे उत्पादन करून त्याचे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मोफत वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणात मदत म्हणून सुमारे २०० बेड्स व पीपीई किट उपलब्ध करुन देऊन नागरिकांचे कोविड संसर्गापासून दिलासा मिळवून दिला. त्याचबरोबर विघ्नहर कारखान्याचे सर्व कामगार व अधिकारी यांच्या एका दिवसाच्या पगाराची सुमारे ७ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडे सुपूर्द करून कोविडग्रस्त नागरिकांना सहाय्य केले. त्याचबरोबर यंदा पावसामुळे महापूर येऊन बाधित झालेल्या नागरिकांसाठी अन्नधान्य, किराणामाल व जीवनावश्यक वस्तू रवाना करीत असल्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
याप्रसंगी चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
‘विघ्नहर’कडून कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांकरिता अन्नदान्य, किराणामाल व जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आले. या वेळी चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले व अधिकारी वर्ग उपस्थित होते.