आळेफाटा/राजुरी : दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत राजुरी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या २६ विद्यार्थ्यांनीना शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नाश्त्याच्या अन्नातून विषबाधा झाली. राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संबंधितांवर तातडीने उपचार करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरी येथे एका प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या वतीने सहयाद्री व्हँली आभियांत्रिकी महाविद्यालयात केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत मुला मुलींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे प्रशिक्षण घेण्यासाठी आल्यानंतर काही वेळाने यातील २६ विद्यार्थ्यांनींना मळमळ व पोटदुखी असे त्रास होऊ लागले. तातडीने त्यांना राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यामधील बारा मुलींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर एका मुलीला उपचारासाठी आळेफाटा येथे तर उर्वरित मुलींना उपचारानंतर सायंकाळी घरी सोडण्यात आल्याचे व त्यांना दुषित अन्नामुळे पोटदुखी व मळमळ असा त्रास झाल्याचे राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रामप्रसाद धायकर यांनी सांगितले. याबाबत सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य भूषण बो-हाडे यांनीही संबंधित विद्यार्थिंनींना पोटदुखी व अवेळी जेवणामुळे असा त्रास झाला असावा असे सांगत या विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयाच्या नसून दुरगावच्या आहे. त्या येथे केवळ दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत.
आळेफाटा येथे २६ विद्याथिर्नींना अन्नातून विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 4:19 PM
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत राजुरी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या २६ विद्यार्थ्यांनीना शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नाश्त्याच्या अन्नातून विषबाधा झाली.
ठळक मुद्दे२६ विद्यार्थ्यांनींना मळमळ व पोटदुखीचा त्रासदीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण