पुणे : घरातील कर्त्या पुरूषाच्या आत्महत्या असो किंवा सीमेवर तैनात असताना आलेले वीरमरण. शेवटी एक गोष्ट यात निश्चितच घडते ती म्हणजे या कुटुंबाचा आधार हरवतो. हे दु:ख कधीही न भरुन येणाºया स्वरुपाचे आहे. अशा कुटुंबांच्या घरी जाऊन तिथे गुढी उभारत काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबांचे सांत्वन केले. सरकार नसले तरी समाज तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा देत या युवा कार्यकर्त्यांनी या कुटुंबांचे दु:ख काही प्रमाणात हलके करण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील सोंदाळा गावातील शेतकरी सूर्यभान ज्ञानदेव अरगडे (वय,३२),उत्सव धुमाला गावातील शेतकरी दिलीप मदाजी काकडे (वय-४८) त्याच परिसरातील पांडुरंग रामा कदम व अन्य काही शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. या तीनही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमवेत सांत्वन केले.त्यांच्या घरी गुढी ऊभारण्यात आली. शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी रांगोळी काढण्यात आली. या सर्व कुटुंबांना आर्थिक मदतही देण्यात आली.काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीचे सरचिटणीस अमित बागूल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी ते कार्यकर्त्यांसमवेत उपेक्षित,दु:खित समाजघटकांच्या घरी जाऊन सण साजरा करतात. या उपक्रमाचा भाग म्हणून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद अशोक कामठे,सातारा येथील कर्नल शहीद संतोष महाडिक, पाकिस्तानच्या ताब्यातून सुटून आलेले शिपाई चंदू चव्हाण यांच्या धुळे येथील निवासस्थानी देखील गुढी उभारण्यात आली होती. संतोष पवार, योगेश निकाळजे,धनंजय कांबळे, संतोष गेळे, गोरख मरळ, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल,अॅड.चंद्रशेखर पिंगळे, विक्रांत गायकवाड, आदी पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते.
दु:खितांच्या घरी अन्नदाता गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 7:36 PM
सरकार नसले तरी समाज तुमच्या पाठीशी आहे,असा दिलासा देत या युवा कार्यकर्त्यांनी या कुटुंबांचे दु:ख काही प्रमाणात हलके करण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देयुवा काँग्रेसचा उपक्रम: आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिला दिलासाउपेक्षित,दु:खित समाजघटकांच्या घरी जाऊन सण साजरा