पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, शिक्षण आणि मानव विकास शिक्षण संस्था (सारथी) मार्फत पीएच.डी साठी नाेंदणी केलेल्या सर्व पात्र उमेदवारांना अधिछात्रवृत्ती द्यावी तसेच येत्या १० जानेवारी हाेणारी सीईटी परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी उमेदवारांनी पुण्यातील सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदाेलन केले. तसेच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात नाही ताे पर्यंत आंदाेलन सुरूच ठेवणार असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला.
बार्टी संस्थेच्या वतीने पीएच.डी संशाेधक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर सारथी संचालकांनीही चाळणी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालयासमाेर ठिय्या देत आंदाेलन केले. तसेच सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशाेक काकडे हे जाेपर्यंत परीक्षा रद्द करणार नाहीत ताे पर्यंत आंदाेलन सुरूच ठेवणार असा निर्धार त्यांनी केला.