पुणे : शाळेत जाण्यासाठी कपड्याला इस्त्री करत असलेल्या मुलीला बापानेच बॅड टच केला. त्याला मुलीने विरोध करताच बापाने गरम इस्त्रीचा चटका दिल्याची घटना कात्रज येथे घडली. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून ४३ वर्षीय नराधम बापाविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शालेय शिक्षण घेते. २ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास ती शाळेत जाण्याची तयारी करत होती. त्यासाठी ती कपड्यांना इस्त्री करत असताना, पाठीमागून आलेल्या बापाने तिला बॅड टच केला. मुलीने याचा जाब विचारला, बापाने शिवीगाळ करत तिच्या दप्तरातील पुस्तके फाडून टाकली. यानंतर त्याने पुन्हा बॅड टच केला असता मुलीने बापाला ढकलून दिले. याचा राग आल्याने बापाने मुलीच्या गालाला गरम इस्त्रीचा चटका देत तिला मारहाण केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक थले करत आहेत.