शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

...त्यासाठी मी पंतप्रधानांची वेळ घेऊन भेटायला जाणार; शरद पवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 2:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न चालू केले

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न चालू केले आहेत.  ते प्रयत्न आपल्या उपक्रमास बळकटी देण्याचे काम करतील. त्यामुळे राज्यातील सेंद्रीय शेतीबाबतचे केंद्र स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन भेटणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. 

महाराष्ट्र ऑरगॅनिक अ‍ॅण्ड रेसिड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) च्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक व्यवस्थापकीय संचालक युुुगेंद्र पवार यांच्या   ‘अनंतारा’ निवासस्थानी ज्येष्ठ नेते पवार यांच्या समवेत पार पडली. यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी संबधित मंत्री, सचिव, अधिकारी, मोर्फा पदाधिकाऱ्यांसाठी स्वत: बैठक घेत पुढाकार घेणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मोर्फा च्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या चळवळीस नक्कीच गती येईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

‘मोर्फा’ चे संचालक गणेश शिंदे म्हणाले, सेंद्रिय  शेतमाल विक्रीसाठी विश्वासहर्ता महत्वाची आहे. त्यासाठी युगेंद्र  पवार यांनी अमुल सारखा एकच ब्रँड करून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास मार्केटिंगची समस्या राहणार नाही.  ....त्यानंतर दुपारी पवार स्वत: बैठकीत पोहोचले.

‘मोर्फा’च्या बैठकीसाठी राज्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. शेतकऱ्यांची हि इच्छा काही पदाधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितली. यावर ज्येष्ठ नेते पवार यांनी शेतीप्रयोग करणारे उपक्रमशील  शेतकरी बारामतीत एकत्र आले आहेत. एवढ्या जणांना येथे गोविंदबागेत येण्याचा त्रास देण्यापेक्षा मीच बैठकीत पोहचतो, असा निरोप दिला.  त्यानंतर दुपारी पवार बैठकीत पोहोचले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार