मंगेश पांडे ल्ल पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना परदेशी नागरिक व भाडेकरू यांची नोंद ठेवण्याकडे पोलीस प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. ‘व्हिसा’ची मुदत संपूनही परदेशी नागरिक बिनधास्तपणो शहरात राहत आहेत. या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याने शहराची सुरक्षितता धोक्यात सापडली आहे.
शहराची लोकसंख्या 17 लाखांच्या वर आहे. परिमंडळ तीनमध्ये पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, हिंजवडी, सांगवी असे सात पोलीस ठाणो येतात. खून, गोळीबार, घरफोडय़ा या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगारी रोखताना पोलिसांची दमछाक होत असतानाच सांगवीत एका नायजेरियन गुन्हेगाराचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
पोलिसांना चकवा देण्याच्या प्रय}ात इमारतीवरून उडी मारताना पडल्याने जखमी झालेल्या ओनेका अॅनवा बुकवा (वय 35, रा. अक्षर भुवन, फ्लॅट नं. 3क्1, भाऊनगर, पिंपळे गुरव; मूळ गाव नायजेरियन) याचा मृत्यू झाला. रेकॉर्डवरील गुन्हेगार सांगवी परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आल्यानंतर सांगवीसह शहरात एकच खळबळ उडाली. ओनेका भाडय़ाने राहत असलेल्या इमारतीच्या मालकाने पोलिसांना माहिती देणो गरजेचे होते. मात्र, पोलिसांकडेच माहिती नसल्याने तपासात अडचण येत आहे. ओनेकासारखे आणखी गुन्हेगार शहरात वास्तव्यास असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात वास्तव्य करण्यासाठी परदेशी नागरिकाचा ‘व्हिसा’ असतो. त्याची ठरावीक मुदत असते. ‘व्हिसा’ची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करणो आवश्यक आहे. याबाबत पोलिसांच्या विशेष शाखेला कळविणो गरजेचे असते. मात्र, ‘व्हिसा’ची मुदत संपूनही अनेक परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. मुदत संपलेले ‘व्हिसा’ तपासण्याची जबाबदारी शहर पोलिसांच्या विशेष शाखेची असते. मात्र, व्यवस्थित तपासणी होत नसल्याने परदेशी नागरिक बिनधास्तपणो शहरात राहत आहेत. मुदत संपलेल्या परदेशी नागरिकावर तातडीने कारवाई करणो गरजेचे आहे. तसेच भाडेकरूंची नोंद असणोही महत्त्वाचे आहे. यासाठी पोलिसांकडून आवाहन केले जाते. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. स्थानिक पोलीस ठाणो अथवा चौकीतही नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाडेकरूंच्या नोंदीसाठी पुणो पोलिसांचे संकेतस्थळ आहे. मात्र, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नाही.
नोंद करतानाही अनेक अडचणी
4भाडेकरूची नोंद करण्यासाठी पोलिसांनी 666.3ील्लंल्ल31ीॅ.्रल्ल हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मात्र, ब:याचदा ते बंदच असते. पोलीस ठाण्यात अथवा चौकीत नोंद करायला गेल्यास घरमालकावरच प्रश्नांचा भडिमार केला जातो. भाडेकरूंची नोंद करताना घरमालकाचीच दमछाक होते.
आरोपींचा शोध घेणो सोपे
4भाडेकरूची नोंद करताना त्याचे छायाचित्र, पॅनकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रंसह भाडेकरूचे मूळ गाव, त्यांच्या इतर नातेवाइकांची माहिती पोलिसांकडे जमा करणो गरजेचे आहे. पोलिसांकडे पुरेपूर माहिती असल्यास संबंधित भाडेकरूकडून एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याचा शोध घेणो सोपे जाते.
खबरदारी महत्त्वाची
4एखादा गुन्हा घडतो त्या वेळी आरोपी कुठले आहेत, याचा शोध घेतला जातो. दरम्यान, आरोपी परदेशातील असल्याचे समोर येते. त्याची पूर्ण माहिती पोलिसांकडे नसते की, घरमालकाकडे नसते. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींर्पयत पोहोचताना सर्वाचीच दमछाक होते. घटना घडल्यानंतर त्यावर विचार करण्याऐवजी अगोदरच उपाययोजना राबविणो गरजेचे आहे.
स्थानिक पोलिसांत नोंद
4कोणताही परदेशी नागरिक परिसरात राहायला आल्यास घरमालकाने संबंधित नागरिकाने व्हिसा असतानाही पोलीस मुख्यालयातून ‘सी फॉर्म’ घेऊन तो स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करणो आवश्यक आहे. यामुळे परिसरात राहायला आलेल्या परदेशी नागरिकाची पोलिसांकडे नोंद राहते.
कारवाईची तरतूद
4भाडेक रू ठेवताना भाडेकरूची नोंद ठेवणो पोलिसांकडे असणो आवश्यक आहे. नोंद न केल्यास भारतीय दंड विधान 188 कलमान्वये घरमालकावर कारवाईची तरतूद आहे.
4पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात मोठमोठय़ा कंपन्यांसह अनेक मोठी महाविद्यालये, आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे शहर व परिसरात वास्तव्यास असणा:या परदेशी नागरिक व विद्याथ्र्याची संख्याही अधिक आहे. या सर्व नागरिकांची नोंद पोलिसांकडे असणो गरजेचे आहे.
4कासारवाडी, कुदळवाडी या भागात काही वर्षापूर्वी दहशतवादी संघटनेतील काहीजण सापडले होते. या वेळी ठिकठिकाणी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करण्यात आले. त्या वेळी भाडेकरू नोंदीचा मुद्दा समोर आला, मात्र त्यानंतर पुन्हा याकडे दुर्लक्ष झाले.