शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
3
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
4
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
5
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
6
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
8
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
9
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
10
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
11
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
12
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
14
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
15
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
16
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
17
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
18
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
19
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
20
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण

काळा पैसा उधळण्यासाठी परदेश दौरे

By admin | Published: November 15, 2016 3:44 AM

आशिया खंडात नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात काळ्या पैशांची उलाढालही मोठी असल्याची चर्चा आहे.

पिंपरी : आशिया खंडात नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात काळ्या पैशांची उलाढालही मोठी असल्याची चर्चा आहे. शहरातील काही राजकारणी, व्यापारी, उद्योजक, तसेच वित्त संस्थांचे संचालक यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. आता नोटा रद्दमुळे काळा पैसा असणारे अडचणीत आले असून, श्रीमंतांच्या मुलांनी विविध देशांच्या दौऱ्यावर जाण्यासाठी अचानक बुकिंग सुरू केले आहे. केंद्र सरकारने काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी ८ नोव्हेंबरला रात्री एक हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या. व्यापारी, उद्योजक, वित्तसंस्थांचे संचालक यांनी काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जे अगोदरच परदेशात गेले आहेत, त्यांनी काळ्या पैशांची विल्हेवाट लावलीच; शिवाय काहींनी तातडीने परदेश दौऱ्याची तयारी केली. चलनातून हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्या. नोटा बदलून देणारी यंत्रणा विस्कळीत झाली. खर्चावर मर्यादा आल्या. त्यामुळे काहींनी जवळच्या पर्यटन स्थळांकडे मोर्चा वळवला आहे. परदेश दौरा करणाऱ्यांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यासाठी परदेश दौरे सहजशक्य अशी बाब झाली आहे. सहकारी बँकांचे संचालक, तसेच हॉटेल व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक यामध्ये आघाडीवर आहेत. अगदी महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले सहजपणे परदेश दौऱ्यावर जाऊन येत आहेत. परदेश दौऱ्याचा खर्च ही त्यांच्यासाठी क्षुल्लक बाब आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांना बँकेचे कर्ज काढण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. एखाद्या स्पर्धेसाठी निवड झाल्यास खेळाडूंना अक्षरश: वर्गणी जमा करून परदेशात जाण्यासाठी निधी उभारावा लागतो. त्याचवेळी काळा पैसा उधळण्यासाठी श्रीमंतांची मुले मौजमजेसाठी परदेश दौरे करीत असल्याचे काही टुरिस्ट कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.(प्रतिनिधी)