बारामती: कन्हेरी (ता .बारामती)येथील वनपरीक्षेत्रातील तीन एकरांवरिल अतिक्रमण काढत वन विभागाने धडक कारवाई केली .तालुक्याचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी याबाबत माहिती दिली.
त्यानुसार बारामती तालक्यातील मौजे कन्हेरी वनक्षेत्रात राखीव वन सर्व्हे नंबर ४३ त्याचा बदलेला सर्व्हे नंबर ६३ त्याचा सध्याचा गट नंबर २९३ मध्ये राखीव वनक्षेत्रापैकी क्षेत्र ५ एकर एवढे भगवान देवबा क्षिरसागर (रा .काटेवाडी, ता.बारामती )व मारुती विष्णु भिसे या आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने व सहकार्याने गुन्हा केला .तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त यांचे अवैधरीत्या आदेशान्वये भारतीय वन अधिनियम १९२७ व वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा भंग करून वन गुन्हा केला. प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
दत्तात्रय निवृत्ती पाटोळे (रा.काटेवाडी ता.बरामती) वनगन्हा दाखल केलेवरून कन्हेरी राखीव वन सर्वे नंबर ६४ सध्याचा गट नंबर २८९ या राखीव वनक्षेत्रावर वरील आरोपीने 0.32 हेक्टर आर अतिक्रमण निष्कासित केले.
किशोर हंसराज पाचंगे व दत्तात्रय निवृत्ती पाटोळे यांनी फॉगट नंबर २८९ सर्वे नंबर ६४ मधील ४३ गुंठे शेतीचे अतिक्रमण हटविले.भगवान देवबा क्षिरसागर यांनी राखीव वन सर्व्हे नंबर ६४ त्याचा सध्याचा गट नंबर ०.२३ हे. अतिक्रमण काढले.तसेच वन सर्व्हे नंबर ६३ मध्ये १६ गंठे अतिक्रमण केलेले क्षेत्र अतिक्रमण काढून ताब्यात घेतले.
या कारवाईत बारामतीचे वनपाल हेमंत मोरे, मोरगावचे वनपाल अमोल पाचपुते, करंजेचे वनपाल प्रकाश चौधरी, बारामतीच्या वनरक्षक मीनाक्षी गुरव, शिर्सुफळचे वनरक्षक अनिल माने, पिंपळीच्या वनरक्षक संध्या कांबळे यांच्यासह दौंड व इंदापूर वनपरिक्षेत्रातील ५० वन कर्मचा-यांनी सहभाग घेतला. विशेष शासकीय अभियोक्ता अभिजित साकुरकर यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.