पुणे : मतदार याद्यांच्या पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यामधील मतदारांची प्रारूप यादी निवडणूक शाखेने प्रसिद्ध केली आहे. मतदार यादीत बदल करायचा असल्यास नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. राजकीय पक्षांनीही मतदार केंद्र प्रतिनिधी नेमावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.या मोहिमेमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºयांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. पत्त्यामधील दुरुस्ती, दुबार नावांमधील बदल, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे मतदारांना वगळता येणार आहेत. राजकीय पक्षांकडून शेवटच्या काही दिवसांत हरकती व सूचना येण्यास सुरुवात होते. कार्यकर्त्यांनी जर सुरुवातीपासूनच हरकती व सूचना दिल्या, तर त्यावर अंमलबजावणी करणे अधिक सोपे होईल.राजकीय पक्षांच्या वतीने मतदार केंद्र प्रतिनिधी नेमल्यास त्यांना दिवसाला १० अर्ज देता येतील. महिनाभरात त्यांच्याकडून ३० अर्ज स्वीकारले जातील. त्यापेक्षा अधिक अर्ज आल्यास मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी त्या अर्जांची फेरतपासणी करतील, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.प्रारूप मतदार याद्या सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, महापालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा येथे नागरिकांना पाहता येणार आहेत.पुनरीक्षण कार्यक्रमाची रूपरेषा३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर हरकती आणि सूचना स्वीकारणार७ व १३ आॅक्टोबर मतदार यादीमधील संबंधित भागाचे (सेक्शनचे) ग्रामसभा;तसेच स्थानिक संस्था येथे वाचन८ व २२ आॅक्टोबर विशेष मतदार नोंदणी मोहीम५ डिसेंबर हरकती निकालात काढणे२० डिसेंबर डाटाबेसचे अद्ययावतीकरण करणे५ जानेवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे
निवडणूक शाखेतर्फे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 6:57 AM