ओतूर (पुणे) : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकला जाण्यापूर्वी शिवनेरी गडावर उतरून श्री छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊंचे दर्शन घेऊन पुढे जाणार होते. मात्र, केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी नाकारण्यात आली.
ही बाब शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी ठरली. त्यामुळे शिवसैनिकांनी चंग बांधून शिवजन्मभूमी येथील पवित्र माती कलश घेऊन तो कलश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ अहिर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी समन्वयक शिवसेना पुणे संभाजी तांबे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, उपतालुका प्रमुख भाऊ इसकांडे, विभाग प्रमुख वैभव नलावडे, शिवसैनिक कैलास डुंबरे, भाऊसाहेब कडाळे, महादेव खंदारे, आशिष शहा व सेनेचे वितरक गणेश चौधरी उपस्थित होते. पवित्र मातीचा कलशमधील पवित्र भूमीतील माती सर्व जिल्ह्यांमध्ये पाठविली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.