नारायणगाव : जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते, जुन्नर विधानसभेचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे , शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घआजाराने रविवारी (दि. ११ ) रात्री १०.३० वा. निधन झाले . ते 74 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्रीताई बेनके , प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अमोल बेनके ,जुन्नरचे आमदार अतुल बेनके, युवा नेते अमित बेनके, सुना, नातवंडे असा असा परिवार आहे.
वल्लभ बेनके यांचा जन्म २३ जून १९५०ला जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रूक या गावात झाला. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून १९८५ मध्ये भारतीय इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथम ते निवडून आले होते. त्यानंतर १९९० पुन्हा निवडून आले . सन २००४ आणि २००९ मध्ये पराभूत होऊनही जुन्नर मतदार संघात आपला दरारा ठेवून सर्व सामन्याचे प्रश्न सोडविणारे वल्लभशेठ बेनके यांना राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उत्तर पुणे जिल्ह्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात दरारा असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. सन २००९ आणि २०१४ मध्य पुन्हा निवडून आले होते. सर्व पक्षा मध्ये त्यांचे स्न्हेपूर्ण संबध होते. कुकडीच्या पाण्यासाठी नेहमीच त्यांनी संघर्ष केला होता. त्यांच्याच काळात जुन्नर तालुका कृषीप्रधान तालुका म्हणून उदयांस आला.