भारतीय वायूसेनेत प्रा. डी. पी. आपटे यांनी सुमारे २५ वर्षे सेवा दिली. ग्रुप कॅप्टन या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर, माईर्स एमआयटी संस्थेत एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये २००३ मध्ये ते संचालक म्हणून रुजू झाले. प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी संस्थेत स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या भारतीय छात्र संसदेचे ते समन्वयकही होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची स्थापन झाल्यानंतर ते या विद्यापीठाचे पहिले कुलसचिव होते. त्यानंतर प्र-कुलगुरू पदावरून निवृत्त झाले. सध्या ते एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड आणि कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी प्रा. आपटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
फोटो-दीपक आपटे