माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 09:18 IST2025-03-10T09:18:41+5:302025-03-10T09:18:41+5:30

Ravindra Dhangekar Resign Congress: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

Former MLA Ravindra Dhangekar has resigned from Congress | माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार

माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार

Ravindra Dhangekar ( Marathi News ) : काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिलेला आहे. धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले.

“...तर राज ठाकरेंना माफ केले जाणार नाही, गंगामातेचा अपमान, ६० कोटी भाविक...”; कुणी केली टीका?

रविंद्र धंगेकर म्हणाले, माझी नाराजी काँग्रेस  ( Congress) पक्षावर नाही. सत्तेत असल्याशिवाय कामं होतं नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलेले नाही. काँग्रेस सोडताना मला दु:ख होत आहे, असंही धंगेकर म्हणाले. शिंदेसह काम करायला हरकत नाही, मी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नाही. मी कधी जात पात मानत नाही. सत्तेत जाऊन काम करण्याची इच्छा माझ्या कार्यकर्त्यांची आहे. याआधी शिंदे माझ्याबाबतीत बोलले आहेत. जो काही निर्णय होईल तो संध्याकाळी निर्णय होणार आहे, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले.

"काँग्रेस पक्षाचे मी नेहमी आभार मानतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिली. काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले. एखादा पक्ष सोडणे खूप कठिण असतं. पण कार्यकर्ते आणि मतदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.एकनाथ शिंदे यांनी मला या आधी दोन तीन वेळा फोन केला होता. उदय सामंत यांनीही मला फोन केला होता. आमच्यासोबत काम करा असं त्यांनी सांगितलं होतं. आज आमची भेट होणार आहे, यानंतर पुढचं सगळं ठरवणार आहे, असंही माजी आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले. मी काँग्रेस पक्षावर कधीही नाराज नाही, त्यांनी मला भरपूर दिलं आहे, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले.

"काँग्रेसमधील अनेकांसोबत कौटुंबिक नात तयार झाले आहे. सर्वांनीच माझ्यावर प्रेम केले आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत सगळ्यांनीच माझ्यासाठी ताकद उभी केली. मी निवडणूक हरलो हा नंतरचा विषय आहे. पण सर्वांनी कष्ट केले. पक्ष सोडताना दु:ख होतं कारण शेवटी आपण माणूस आहे, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले.

Web Title: Former MLA Ravindra Dhangekar has resigned from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.