पाषाण : माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार दिनांक २६ ऑक्टोंबर २०२२ रोजी निधन झाले. विनायक निम्हण हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. दोन वेळा ते कोथरूड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर कोथरूड मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात देखील आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते.
माजी आमदार विनायक निम्हण कोथरूड मतदारसंघांमध्ये माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या नंतर शिवसेने तर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. कोथरूड मतदार संघामध्ये निम्हण यांनी त्याच ताकतीने शिवसेना वाढवली. विनायक निम्हण हे पुण्यातील राजकारणामधील एक बडे प्रस्थ होते. सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठे करण्याची त्यांची खुबी होती. विनायक निमहण यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून आमदार की पर्यंत पोहोचले होते.
विनायक निम्हण हे कोथरूड मतदारसंघातून दोन वेळेस (१९९९ ते २००९) शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर त्यानी नारायण राणे यांच्या बरोबर काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर मतदार संघामध्ये (२००९ ते १०१४) काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निडून आले होते. पुणे शहरातील सर्वात मोठे रिसॉर्ट असलेल्या सनी वर्ल्ड चे ते मालक होते.