शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत; नगर अर्बन बॅंक २२ कोटींची फसवूणक प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 7:56 PM

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तत्कालीन संचालकासह दोघांना अटक

पिंपरी : नगर अर्बन को-ऑप बॅंकेची २२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. ६) बॅंकेच्या एका तत्कानील संचालकासह दोन आरोपींना अटक केली आहे. पिंपरीतील मोरवाडी न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत (दि. ९) पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात बॅंकेचे तत्कालीन संचालक असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांचीही चाैकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

नवनीत शांतीलाल सूरपुरिया (रा. अहमदनगर), तसेच यज्ञेश बबन चव्हाण (रा. संभाजीनगर, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली आहे. बॅंकेच्या चिंचवड येथील शाखेत २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजुदेवी हरिमोहन प्रसाद (सर्व रा. चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी), अभिजित नाथा घुले (रा. अहमदनगर), यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य, तसेच नगर अर्बन को-ऑप बॅंकेचे संचालक सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.  

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बॅंकेच्या प्रशासकांनी प्राधिकृत केले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मे. नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनियरिंग इंडस्ट्रिज पुणे या फर्मचे कर्जदार आरोपी यांनी संगनमत करून स्वत:च्या फायद्यासाठी कर्जप्रकरण केले. त्यासाठी तारण गहाण मिळकतीचा बनावट मूल्यांकन अहवाल दिला. कर्ज उपसमिती सदस्य व बॅंकेच्या संचालक सदस्यांनी तो अहवाल स्वीकारून बॅंकेची २२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिल्यानंतर  आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी पहाटे अहमदनगर येथे रवाना झाले. आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अहमदनगर येथून बॅंकेचे तत्कालीन संचालक नवनीत सूरपुरिया यांना अटक केली. तसेच चिंचवड येथे आरोपी यज्ञेश चव्हाण याला अटक केली. अहमदनगर येथील माजी खासदार दिलीप गांधी हे बॅंकेचे तत्पकालीन संचालक असून, त्यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात बॅंकेची फसवणूक झाली आहे. त्यामुळे याप्रकरणात त्यांचीही चाैकशी होईल, असे पोलीस निरीक्षक बाबर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDilip Gandhiखा. दिलीप गांधीfraudधोकेबाजीbankबँकPoliceपोलिसArrestअटक