पुणे: गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतो आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारत आहे. राजू शेट्टींनी आज बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.
तुकाराम मुंढेंच्या बदलीवर ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. यावेळी त्यांनी मोर्चेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आता आक्रमक व्हावे लागेल. त्यामुळे एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
बारामती येथील मोर्चेस संबोधित करताना मा.राजू शेट्टी.
Posted by Raju Shetti on Thursday, 27 August 2020
राष्ट्रवादीच्या गळचेपीमुळे राजीनामा देणाऱ्या खासदाराला उद्धव ठाकरेंनी केला फोन; म्हणाले...
राज्यातील दुध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असून २५ रुपये प्रतिलिटरचा दर राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचे सरकार आल्यानंतरही १७ ते १८ रुपयांवर घसरला आहे. उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने दुध उत्पादकांना दर मिळत असून प्रतिलिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च असलेल्या दुधाचा दर वाढवून द्यावा, दुधावरील जीएसटी रद्द करावी, केंद्र सरकारने दुधाच्या भुकटी आयातीचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या घेऊन स्वाभिमानीने दुध दर आंदोलन सुरू केले आहे.
सुप्रिया सुळेंनी लगावला टोला-
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. आमचे सरकार दडपशाहीचे सरकार नाही. त्यामुळे कोणाला आंदोलनाची इच्छा झाली तर त्याचे स्वागत करायला हवे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावला. दूध दरावरून शेतकरी संघटनेने बारामतीमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी हे वक्तव्य केले.
अन्य महत्वाच्या बातम्या-
मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे; सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची डरकाळी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; ठाकरे सरकारने घेतले ७ महत्वाचे निर्णय
मुख्यमंत्री ठाकरेंना डोंबिवलीत फेरफटका मारा म्हणणाऱ्या राजू पाटलांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर