ग्रामपंचायतीच्या एकूण १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर ९ जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. विद्यमान सरपंच अनिल नवले यांच्या पॅनलला कारेगाव ग्रामपंचायतीची सत्ता गमवावी लागली तर शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे हे ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेस यशस्वी झाले आहेत. सदस्यपदी निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे: प्रभाग क्र.१ - सोनाली विकास नवले (बिनविरोध), निर्मला शुभम नवले व तुषार प्रकाश नवले,प्रभाग क्र.२ - शहाजी पोपट तळेकर, प्रियंका संदीप गवारे,प्रभाग क्र.३ - तेजस गणपत फलके,भावना शंकर नवले, प्रभाग क्र.४ - अजित प्रल्हाद कोहकडे, जयश्री रामदास कोहकडे व नागेश सर्जेराव शेलार प्रभाग क्र.५ - संदीप विश्वनाथ नवले, विद्या दीपक कोहोकडे आणि हौसाबाई लाला जगताप (तिघेही बिनविरोध)
दरम्यान, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे,आंबेगाव - शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दीपक कोहकडे यांच्या हस्ते सर्व नूतन सदस्यांचा फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
२३ रांजणगाव गणपती
विजयी उमेदवारांचा मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.