पुणे : श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक कुमार संघकारा यांच्यावर हिंजवडीच्या रूबी हाॅल क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले. त्यांच्यावर डिहायड्रेशन आणि तापावर उपचार करण्यात आले. त्यांना गुरूवारी सामन्यांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला.
संघकारा यांचे भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी ४ जानेवारी रोजी संध्याकाळी अंग थरथर कापत असल्याने त्यांना संध्याकाळी ८ वाजता हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले हाेते. संघकारा यांना थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि ताप आला हाेता. तसेच त्यांच्या अंगातील पाण्याचे प्रमाणही कमी झालेले हाेते. ताप तर १०३ डिग्री सेल्सिअस होता.
त्यांच्यावर उपचार करणारे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख म्हणाले की आम्ही संघकारांना दवाखान्यात दाखल करून घेतले आणि त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण पुर्ववत केले. साेबत इतर सहाय्यक उपचार दिले गेले. आणि ते विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाले. संघकारा म्हणाले की, रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वांनी उत्तम काळजी घेतली.