गेली ४० वर्षे त्यांनी तंत्र शिक्षण, व्यवस्थापन, संशोधन, नियोजन आणि प्रशासकाची भूमिका यशस्वीरीत्या पार पाडली. आयआयटी गुवाहटी आणि लखनऊ, इंदौर, कोलकत्ता व ग्वाल्हेर येथे आयआयएमच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण भूमिका त्यांनी निभावली. वर्ल्ड बँक प्रोजेक्टचे राष्ट्रीय संचालक ही होते. त्याचप्रमाणे ते एआयसीटीईचे सदस्य सचिव होते. केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयात विविध पदांवर ही कार्य केले होते. मुंबई येथील एनआयटीआयईचे संचालकही होते.
बार्शी येथे माईर्स एमआयटी संस्थेच्या वतीने सुरू केलेल्या भारतातील पहिल्या रेल्वे इंजिनियरिंगच्या उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. डॉ. आवळे हे अतिशय बुद्धिमान, हुशार, कुशल प्रशासक व व्यवस्थापक म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. रेल्वे इंजिनियरिंगचे संचालक म्हणून कार्यरत होते, असे एमआयटीचे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले.
फोटो - सुभाष आवळे