पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३५४ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ''''''''किल्ले राजगड उत्सवा''''''''चे आयोजन राजगड येथे करण्यात आले आहे. त्या सोहळ््याचा लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा पुण्यातील सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे झाला. यावेळी भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, अभय माटे, वसंत प्रसादे, डॉ. सचिन जोशी, सूर्यकांत भोसले, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, योगेंद्र भालेराव, रश्मी अनिल मते उपस्थित होते.
रावत म्हणाले, ''''''''शिवचरित्र ही एक साहस कथा आहे, असे समजून त्याकडे आपण पाहिले, तर आपल्याला शिवरायांचे खरे चरित्र समजले नाही. आम्ही एक आहोत, ही भावना निर्माण करणारे शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शिवरायांनी आताच्या पिढीकरीता राष्ट्रनिर्माणाची आधुनिक तीर्थक्षेत्र निर्माण केली आहेत. आजच्या काळातील आव्हानांवर मात करण्यासाठी शिवचरित्र हे सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल.''''''''
राजगडावर १९ डिसेंबर रोजी खंडोबाच्या माळावर पाली गाव राजगड पायथा येथे दुपारी ४ वाजता गड जागरण कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ढोल-ताशा स्थिरवादन आणि यानंतर व्याख्यान व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २० डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सुर्यकांत भोसले यांच्या हस्ते सुर्योदयाच्यावेळी ध्वजारोहण होणार आहे. यानंतर सकाळी ८ वाजता पाली दरवाजा ते महाराजांचे सदर ते पद्ममावती मंदिरपर्यंत पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.