सासवड : चालकाच्या समोरील काच अचानक फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या. चालू वाहनातच हा प्रकार घडला. तथापि चालकाला चष्मा असल्यामुळे त्याला कोणतीही इजा झाली नाही आणि बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सासवड आगाराच्या सासवड -सुपा या बसचा हा अपघात या मार्गावरील तक्रारवाडीच्या जवळ आज (शनिवार २१ जुलै ) रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड डेपोची सकाळची सव्वानऊची सुपा बस (क्रमांक एमएच १२ ई एफ ६२५९) नेहमीप्रमाणे चालक सुभाष सातव व वाहक रामचंद्र गावडे घेऊन मार्गस्थ झाले .१५ प्रवाशांसह बसचा प्रवास सुरु असताना तक्रारवाडीनजीक आल्यावर अचानक चालकाच्या समोरची काच फुटून सर्व काचा केबिनमध्ये उडाल्या . काही काचा वाहकाच्या जवळ आल्या . अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशी घाबरून गेले. परंतु सातव यांच्या डोळयांवर चष्मा असल्याने त्यांना दुखापत झाली नाही.त्याही स्थितीत बस पिसर्वेपर्यंत आणली . विशेष बाब म्हणजे चालकाच्या समोरची काच ही नेहमीच्या प्रकारातील नसल्याचे दिसून आले. प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाने गाड्यांच्या सुरक्षेविषयी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे हे या प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .चालकाचा चष्मा नसता तर मोठी दुर्घटना घडली असती .
दैवबलवत्तर... म्हणून अनर्थ टळला ....! एसटीच्या सुरक्षित प्रवासाला ‘ खो’ देणारी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 8:00 PM
प्रवाशांच्या सेवेचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाने गाड्यांच्या सुरक्षेविषयी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे. हे या प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .चालकाला चष्मा असल्यामुळे मोठी दुर्घटना होता होता राहिली
ठळक मुद्देचालू प्रवासातच सासवड सूप बसच्या चालका समोरील काच अचानक फुटली , सुदैवाने जीवितहानी नाही