याबाबत वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकार्यांकडून दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या पावसाळी हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी शेतामध्ये फुलझाडे, तरकारी, तोडीव पिके व पालेभाज्या पिकांची टाकणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्या पिकांच्या लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, विद्युत रोहित नादुरुस्त असल्याने याठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शेतसिंचनाचा प्रश्न उद्भवला आहे.
शेतकऱ्यांच्या समस्येचा विचार करून विद्युत वीज कंपनीने तत्काळ विद्युत रोहित्र बसवून देण्याची मागणी नारायण निकम, राजाराम निकम, चंद्रकांत निकम, भिवाजी भोसकर, लालाशेठ बोरा आदी शेतकऱ्यांनी केली आहे.