वाइल्ड ॲनिमल अअँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीतर्फे रविवारी सकाळी मुठा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या वेळी तरूण-तरूणी यात सहभागी झाले होते. मगरीला पकडण्यासाठी वन विभागाने भिडे पुलाखाली जाळी लावली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला होता. तो पाहून काही तरूणांनी नदी स्वच्छ करण्याचा निर्धार केला आहे. त्यानूसार आज ही मोहिम झाली. यात सोसायटीचे अध्यक्ष आनंद तानाजी अडसूळ, कार्याध्यक्ष गणेश भूतकर,उपकार्याध्यक्ष संतोष थोरात उपस्थित होते.
आनंद अडसुळ या विषयी म्हणाले, नदीपात्रातून साठलेला कचरा काढण्यासाठी संस्थेचे सभासद तसेच स्वयंसेवक नदीत उतरले असता त्यात गाद्या, मोठमोठे प्लास्टिकचे तसेच रबरी पाईप, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकची पोती, प्लास्टिकचे वेगवेगळे बॅनर, प्लास्टिकचे मोठमोठे कागद, साड्या, कपडे, जीर्ण झालेले दोरखंड इत्यादी गोष्टी सापडल्या.’’
या अभियानात विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय चे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तसेच लव केअर शेअर फांउडेशन, एनएसएस एनबीएन कॅालेज सहभागी झाले होेते.
—————————
एकही जलचर प्राणी नाही दिसला
माझ्या मनात घर निर्माण केलेली गोष्ट म्हणजे पुर्ण स्वच्छता मोहीम करताना तेथे एकही जलचर प्राणी आढळून आला नाही. ही फार मोठी खेदाची बाब आहे. याचे गांभीर्य निसर्गावर प्रेम करणाऱ्यांनाच कळु शकते. मोहिमेदरम्यान भेटलेल्या एका आजोबांनी त्यांचे काही अनुभव सांगितले. ते म्हणाले "साधारणपणे ४० वर्षापूर्वी नदीचे पाणी इतके स्वच्छ होते की आम्ही ते पाणी ओंजळीने पित होतो. तसेच त्यावेळी नदीत सर्व प्रकारचे मासे असायचे पण जसं जसा काळ गेला मनुष्यवस्ती वाढली तसं तसे एक एक करून माश्यांचे सर्व प्रकार या नदीतून विलुप्त झाले आजमितीला आम्हाला तेथे एका सुद्धा जलचराचे अस्तित्व आढळले नाही.’’
- आनंद अडसुळ