पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळण्याचे संख्या घटण्याचे प्रमाण कमीच होत नाही. गुरुवारी दिवसभरात १० जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय प्र्रयोगशाळेच्या अहवालावरून निष्पन्न झाले. तसेच, एकूण १५ जणांचे थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले.स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या ५ रुग्णांसह स्वाइन फ्लूचे १० रुग्ण बुधवारी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या एकूण ४२ झाली आहे. वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ५ हजार २० जणांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली. १ जानेवारी ते २५ फेबु्रवारी या कालावधीत गुरुवारपर्यंत १ लाख ८३ हजार ८५४ जणांची ओपीडी कक्षात तपासणी झाली. त्यांपैकी २० हजार ६९२ जणांनी सर्दी, खोकला, तापसंबंधी आजारावर उपचार घेतले. गुरुवारी एका दिवसात एकूण १ हजार २७ जणांनी असे उपचार घेतले. गुरुवारी एकूण २९४ जणांना टॅमिफ्लूचे औषध देण्यात आले. आतापर्यंत टॅमिफ्लूचे औषधे एकूण ३ हजार ६९२ जणांना दिले गेले आहेत. आतापर्यंत एकूण २२२ जणांच्या थुंकीचे नमुने घेतले गेले आहेत. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचे १० रुग्ण आढळले
By admin | Published: February 27, 2015 6:04 AM