पुणे : प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरून चार शहरसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
गाडी क्रमांक ०१३२९ पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस ही ११ ते २० मे दरम्यान दर मंगळवार, गुरुवार व शनिवार पुणे स्थानकावरून रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता गोरखपूरला पोहचेल. तर गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस (०१३३०) १३ ते २२ मे दरम्यान दर गुरुवारी, शनिवारी व सोमवारी गोरखपूर स्थानकावरून सायंकाळी ७ वाजता सुटेल. पुण्याला तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी पोहचेल.
पुणे-दानापूर एक्स्प्रेस (०१३३१) ही १० ते १७ मे दरम्यान दर सोमवारी व शुक्रवारी पुणे स्थानकावरून सकाळी १० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी दानापूरला पोहचेल. तर ०१३३२ दानापूर-पुणे एक्स्प्रेस (०१३३२) ११ ते १८ मे दरम्यान दर मंगळवारी व शनिवारी दानापूर स्थानकावरून रात्री साडेअकरा वाजता निघेल. पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी पुण्याला पोहचेल.
पुणे-दरभंगा एक्स्प्रेस (०१३३३) १३ ते २० मे दरम्यान दर गुरुवारी पुणे स्थानकावरून सकाळी १० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता दरभंगा येथे पोहचेल. तर दरभंगा-पुणे एक्स्प्रेस (०१३३४) ही गाडी १५ से २२ मे दरम्यान दर शनिवारी दरभंगा स्थानकावरून दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल.
०१३३५ पुणे-भागलपूर एक्स्प्रेस (०१३३५) रविवारी १६ मे रोजी पुणे स्थानकावरून सकाळी १० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशीच्या मध्य रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी भागलपूरला पोहचेल. तर भागलपूर-पुणे एक्स्प्रेस (०१३३६) मंगळवार दिनांक १८ मे रोजी भागलपूर स्थानकावरून दुपारी ३ वाजता निघेल. तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल.