पुणे : राष्ट्रीयीकृत बँकेत लिपिक या पदावर नाेकरी लावण्याचे आमिष दाखवित तरुणाकडून ४ लाख ५९ हजार रुपये घेत दाेघांनी त्याची फसवणूक केली. याप्रकरणी ताडीवाला राेड येथील २७ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राॅबिन राजन आणि सुदेश राघवन या दाेघांविराेधात बंडगार्डन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आराेपींनी बँकेतील अधिकाऱ्यांशी ओळख आहे असे फिर्यादींचा विश्वास संपादित केला. त्यानंतर बँकेत लिपिक पदावर नाेकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच मार्च २०२१ ते ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत वेळाेवेळी त्याच्याकडून ४ लाख ५९ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही नाेकरी न लावल्याने फिर्यादी तरुणाने त्यांना दिलेले पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र, आराेपींनी शिवीगाळ करीत मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक जाधव हे करीत आहेत.