अजय रामचंद्र ठवरे ( वय २१, रा. पुरंदर सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली), युवराज दत्तात्रय डोंगरे (वय २४, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली), अक्षय विजय साबळे (वय २२, रा. विश्वदीप तरुण मंडळाजवळ, पुणे स्टेशन), करण बाळू पांढरे (वय २१, रा. खंडोबा मंदिर देवाची उरुळी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास उरुळी कांचन बाजार मैदानालगत ओढ्याच्या जवळ असलेल्या विहिरीलगत रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय ठवरे हा संशायस्पद आढळला, त्यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतल्यावर त्याने धारदार तलवार जवळ बाळगली असल्याचे निष्पन्न झाले. तर रात्री पावणेबाराच्या सुमारास कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयापुढे सोलापूर - पुणे महामार्गाच्या कडेला अक्षय साबळे यांच्याकडूनही धारदार लोखंडी कोयता पोलिसांनी हस्तगत केला. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास युवराज डोंगरे हा थेऊर गावातील सार्वजनिक रस्त्यावर २० इंच लांबीचा लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना सापडला. तर अकराच्या सुमारास उरुळी देवाची हद्दीत गस्त घालत असताना करण पांढरे हा पालखी रोडवर बिग मार्ट दुकानाजवळ धारदार कोयता घेऊन थांबला असताना पोलिसांना सापडला. या चारही घटनेतील तरुणांना पोलिसांनी शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली.