शिरूर : दरोडय़ाच्या तयारीत असणा:या चौघांना पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून मिरचीपूड, कटावणी, करवत, चाकू, दोन लाकडी दांडके, एक सत्तूर व एक मोटारसायकल पोलिसांनी मिळाली.
पिंटय़ा ऊर्फ गौरव सत्यवान वहिले (24), रशीद बाबू सय्यद (4क्), दिनेश श्यामराव माने (26, तिघेही रा. आळंदी रोड, विश्रंतवाडी, मिलिंद बेकरीच्या मागे, पुणो, सध्या लक्ष्मीमाता मंदिराशेजारी, कारेगाव, ता. शिरूर), ज्ञानेश्वर नानाभाऊ वाघुले (25, रा. आळे, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 रोजी रात्री शिरूर परिसरात गस्त घालत असताना जुन्या ईदगाहशेजारी पाच जण संशयितरीत्या फिरताना आढळले. पोलिसांना पाहताच ते पळाले. पोलिसांनी त्यांचा
पाठलाग करून शिताफीने चौघांना पकडले. एक जण अंधाराचा व झाडाझुडपांचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.
अटक केलेल्या चौघांची चौकशी केली असता, ते सध्या कारेगाव येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी चोरी, घरफोडीसारखे बरेच गुन्हे केल्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार तडाखे, हवालदार जितेंद्र पानसरे, शिपाई नितीन गायकवाड, अमित चव्हाण, राजू वाघमोडे, परशुराम सांगळे व नितीन सुद्रिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.
(वार्ताहर)
सराईत गुन्हेगार
पिंटय़ा ऊर्फ गौरव सत्यवान वहिले याच्यावर विश्रंतवाडी पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, मारामारी या स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. तसेच रशीद सय्यद यांच्यावरही मारामारीचे गुन्हे दाखल असल्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.