मीना विजय गायकवाड, कल्पना बाबू जाधव (वय ४१, रा. केडगाव, जि. नगर), राम दशरथ कचरे (वय ४ रा. गांधीनगर, भोलेगाव, जि. नगर), प्रवीण पंढरीनाथ सदाफुले (वय २९,रा. आळे स्टँड, ता. जुन्नर) यांचेवर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ च्या कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार पुनम गणेश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि २२) राजुरी गावचे परिसरातील आळेफाटा ते नगर रोडच्या कडेला जत्रा हॉटेलची पश्चिमेस आशीर्वाद लोणचे समोरील एका रिकाम्या जागेत एक मोटारीत मीना विजय गायकवाड, कल्पना जाधव, श्रीराम कचरे, प्रवीण सदाफुले हे ३ पीडित मुलीना वेश्या व्यवसायाकरिता बाध्य करून पैसे मिळवत होते. पोलिसांनी त्यांच्यावर धाड टाकत मुलींची सुटका केली. तसेच चाैघांना त्यांनी अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, दत्तात्रय जगताप, पोलिस नाईक दीपक साबळे, पोलिस अमलदार संदीप वारे, अक्षय नवले पोलिस नाईक, पोलिस हवालदार पूनम कांबळे, महिला पोलिस नाईक सुनीता मोरे, यांनी केली आहे.
आळेफाटा येथे कुंटनखाना चालवणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:11 AM