शिरवळ : कंटेनर आणि खासगी प्रवासी बसचा शिरवळजवळ बुधवारी पहाटे झालेला अपघात एवढा भीषण होता की, बस चालकाला तब्बल चार क्रेन आणि एक जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले. तेही तब्बल अडीच तासांनंतर.अपघातानंतर रस्त्याच्या मध्यभागी कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावर वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. बसची समोरील बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याने चालक बसमध्ये अडकून पडला होता. काहीवेळानंतर घटनास्थळी एक जेसीबी आणि चार मोठ्या क्रेन मागविण्यात आल्या. चारही बाजूला एकाच वेळी क्रेन लावून बसचा पत्रा ओढण्यात आला. त्यानंतर चालकाला बसमधून बाहेर काढण्यात आले. चालक राजू रेड्डी हा रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने त्याला तत्काळ खासगी वाहनातून जवळच्याच रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वीच जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले होते. (प्रतिनिधी)हलकल्लोळ : साखर झोपेत होते प्रवासीअपघात झाल्याचे समजताच साखरझोपेत असणाऱ्या प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महामार्गावर प्रचंड हलकल्लोळ माजला. शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ बोबडे, पोपटराव कदम तसेच खंडाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.ग्रामस्थांचे मदतकार्यग्रामस्थ अजित यादव, रवी ढमाळ, मकरंद मोटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. अनधिकृत रस्ता दुभाजकाचा प्रश्न ऐरणीवरपुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यावेळी अनेकवेळा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्गासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये अनधिकृत रस्ता दुभाजकाचा प्रश्न चर्चेला आला. संबंधित अनधिकृत रस्ता दुभाजक बंद करून दुभाजक तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.मदतीऐवजी फोटो घेण्यात दंग ! रुग्णवाहिकेच्या सायरनचे आवाज ऐकून मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती तर काहीनी आपल्या मोबाइलमध्ये छायाचित्र घेण्यासाठी व सोशल मीडियावर सोडण्यासाठी गर्दी केल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. बघ्यांना आवरताना पोलिसांची दमछाक उडाली. अपघातानंतर कंटेनरचे दोन भाग कंटेनरला खासगी प्रवासी बसची जोरदार धडक बसल्यानंतर कंटेनरचा पाठीमागील भाग हा महामार्गाच्या मध्यभागी म्हणजे बसच्या अगदी जवळ येऊन पडला. तो आणखी पुढे पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
चार क्रेन लावून बसचालकाला बाहेर काढले
By admin | Published: October 07, 2015 10:00 PM