शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

खताळपट्टा येथील चार घरे आग लागून खाक

By admin | Published: March 30, 2017 12:09 AM

ढेकळवाडी (ता. बारामती) परिसरातील खताळपट्टा येथील चार घरे आग लागून खाक झाली आहेत. या आगीमुळे

काटेवाडी : ढेकळवाडी (ता. बारामती) परिसरातील खताळपट्टा येथील चार घरे आग लागून खाक झाली आहेत. या आगीमुळे पावणेसहा लाखांचे नुकसान झाले आहे. तर, या घटनेत ७५ हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली. या परिसरातील देवकरवस्ती येथे चव्हाण कुटुंब राहत आहे. हे कुटुंब मोलमजुरीसह दुग्धव्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. गुढी पाडवाच्या पूर्वसंध्येला विद्युतप्रवाह शॉटसर्किट झाल्याने आग लागली. या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.या वेळी घरामध्ये विश्रांती घेत असलेले नारायण जाधव यांनी घराला आग लागल्याचे पाहिले. तेव्हा मदतीसाठी आरडाओरड केली. शेजारी असलेले बापूराव त्याच्या मदतीला धावून आले. दोघे मिळून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. आगीची तीव्रता वाढत चालल्याने चारही घरांनी पेट घेतला. यामध्ये महादेव पांडुरंग चव्हाण, बळीराम चव्हाण, ज्योतीराम चव्हाण व भीमराव जाधव यांची घरे आगीच्या विळख्यात सापडली. आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली. काही युवकांनी गोठ्यातील गाई सोडल्या, तसेच बंदिस्त गोठ्याचा दरवाजा मोडून शेळ्या बाहेर काढल्या. पै-पै करून ही रक्कम साठवली होती. ती कशी परत करणार, अशी चिंता हताश होऊन बसलेले चव्हाण व जाधव कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली. रात्री उशिरा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी भेट देऊन पाहणी केली.परिस्थिती पाहून त्यांनी तातडीने चारही कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख मदत केली. तसेच, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, किरण तावरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनीही या कुटुंबांना रोख १० हजार रुपयांची तातडीने मदत केली. (वार्ताहर)