लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : थेरगावातील एक जण चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाजवळ पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती प्रॉपर्टी सेलच्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यांनी सापळा रचून वनदेवनगर थेरगाव येथील सागर गवसणे या आरोपीला ७१ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह २ मेला अटक केली होती. पोलीस कोठडीत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून आणखी चार पिस्तूल, ९ जिवंत काडतुसे असा १ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल प्रॉपर्टी सेल विभागाच्या पोलिसांनी हस्तगत केला.प्रॉपर्टी सेलचे पुणे शहर विभागाचे पोलीस निरीक्षक एस़ व्ही़ शिंदे यांनी त्यांच्या स्टाफला सूचना देऊन सापळ रचला. आरोपी सागर गवसणे याला चिंचवड येथे पकडले होते. त्याच्याकडे बेकायदा बाळगेलेले दोन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे असा ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला होता. त्याच्याकडून आणखी चार पिस्तूल पोलिसांनी शनिवारी जप्त केले.गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पी़ आऱ पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिंदे, तसेच संजय जगताप, सुभाष कुंभार, सिद्धराम कोळी, दिनेश भुजबळ, संभाजी गायकवाड, अमोल भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
चार बेकायदा पिस्तूल जप्त
By admin | Published: May 07, 2017 2:59 AM