शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

चार अपघातांत चार ठार, सात जखमी

By admin | Published: May 23, 2017 5:16 AM

मुंबई-पुणे महामार्गावर व पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या २४ तासामध्ये अपघाताच्या चारघटना घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर व पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या २४ तासामध्ये अपघाताच्या चारघटना घडल्या. त्यामध्ये चार जण ठार झाले असून, सात जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आजचा दिवस अपघातवार ठरला. मुंबई- पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाच्या हद्दीत सकाळी सव्वासहाला झालेल्या मोटारीच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी आहे.शाहरूख फकिर पठाण (वय २४) व अभिजित दयानंद रणपिसे (वय २२, दोघेही रा. आकुर्डी गावठाण) अशी मृत झालेल्या युवकांची नावे असून, सुमीत मनोहर जाधव (वय २६, रा. आकुर्डी गावठाण) हा युवक जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मोटार (एमएच १४ ईपी ५५५०) ही समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रकवर (एमएच २६ एडी १०१५) समोरील बाजूने जोरात धडकून हा अपघात झाला. यामध्ये मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाल्याने मोटारीमधील चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या आर्यन देवदूत पथकाने शर्तीचे प्रयत्न करुन गाडीचा पत्रा कापून अडकलेले मृतदेह बाहेर काढत जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी दाखल लोणावळा महामार्ग पोलिसांनी वाहतूक नियंत्रणात आणत अपघातग्रस्त वाहने आयआरबीच्या मदतीने बाजूला केली.देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड येथील गार्डन सिटी परिसरातील केंद्रीय विद्यालयाजवळ शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव रिक्षाला ओव्हरटेक करीतआलेल्या एका मोटारीने रिक्षाला धडक देऊन रिक्षातील एकाच कुटुंबातील तिघांना जखमी केले आहे. जखमींवर देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सुधीर ताराचंद खंडारे (वय 32), शालू सुधीर खंडारे (वय 30), सुशांत सुधीर खंडारे (वय 8, सर्व रा. विकासनगर, देहूरोड) असे अपघातात जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. अपघातात शालू खंडारे यांना डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरूअसून, सुशांत या आठ वर्षांच्या मुलाच्या हाताला जखम झाली आहे. तसेच सुधीर खंडारे यांना दोन्ही पायांना मार लागला असून, त्यांच्यावर देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड केंद्रीय विद्यालयाजवळ शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुधीर खंडारे हे पत्नी, मुलगा व मुलीसह रिक्षामधून (एमएच १२ एचसी ६५२३) निगडीकडून विकासनगरकडे येत असताना रिक्षाला ओव्हरटेक करीत भरधाव मोटारीने (एमएच १४ एचझेड १३७६) रिक्षाला धडक दिली. यात तिघे जखमी झाले आहेत. मोटारीसह संबंधित चालक फरार झाला आहे. अपघातात पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.