जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या दुर करण्यासाठी येत्या तन वर्षात १ हजार ८७३ गावांमध्ये शंभर टक्के नळ जोडणीची कामे जलजिवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या साठी जलजिवनच्या २ हजार ७७३ कोटींच्या आरखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून दोन हजर योजनांची कामे केली जाणार असून याचा लाभ ३ लाख ७८ हजार ५६९ कुटुंबांना होणार आहे.जलजीवन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर प्रतिपाणसी प्रतिदिन या प्रमाणे वैयक्तिक नळजोडणीची कामे येत्या ३ वर्षात केली जाणार आहे. ही कामे लक्षात घेऊन जलजिवन योजनेचा आरखडा तयार करण्यात आला आहे. यायोजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा हिस्सा उचलणार आहे. तर प्रत्येक गावांना लोकवर्गणीची १० टक्के अट घालण्यात आली आहे. त्यासाठी ५ टक्के रोख आणि पाच टक्के श्रमदाान अशा स्वरूपात लोकसहभाग असणार आहे. जजिल्ह्यात ३४६ गावांमध्ये १०० टक्के नळजोडणीचीकामे यापूर्वी झालेली आहेत. नव्याने १ हजार ८७३ गावांमध्ये नळयोजनेची कामे हाती घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी २ हजार ७४३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामध्ये या वर्षी ४१४ गावामंध्ये२४३ कोटी रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यातून सात हजार कुटुंबांना नळजोडणीद्यारे पाणी पुरविण्यात येणार आहे. तर त्यापुढील वर्षात ९६९ गावांमध्ये एक लाख ९८ हजार ८०१ कटुंबांना नळजोडणी २ हजार १३७ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२२२-२३ या वर्षात ४९० गावांसाठी ३६२कोटी रूपये खर्च करून १ लाख २० हजार ७७३ कुटुंबांना नळजोडणी देण्याचे उद्दीष्ट आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
यंदा टंचाई आराखड्याला दिली बगल
जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्हापरिषदेमार्फतपाणी टंचाई निवारणासाठी कृती कार्यक्रम तयार केला जातो. जिल्हाधिाकाऱ्यांकडून या आराखड्याला मंजुरी दिली जाते. या वर्षी ४३ कोटी रूपयांच्या या आरखड्याला मंजुरी दिली आहे. मात्र, त्याचा समावेश जलजिवन मिशनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या आरखड्यातील कामे करता येणार नाही. त्यामुळे नळ पाणी पुरवठा योजनेची सर्व कामे यापुढे जलजीवन मिळनमधून करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायती १ हजार ३९९
एकुण गावे १ हजार ८७३
एकुण वाड्या वस्त्या ९१३०
एकुण कुटुंब संख्या ९८०१८९
नळ जोडणी नाेंदणी कुटुंबे ६०१३४०
नळ पाणी पुरवठा योजना नसलेली गावांची संख्या : २०, मुळशी (७) आंबेगाव (४), जुन्नर (३), हवेली (३), भोर (२), खेड (१)
नळ जोडणी नसलेली कुटुंबे ३ लाख ७८ हजार ८४९
-----
चौकट
१०३ गावे होणार टँकरमुक्त
जिल्ह्यात दरवर्षी १०३ गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. या गावात पाणी योजना नसल्याने अनेक अडचणी येतात. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यामुळे ही गावे टँकरमुक्त करण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत कामे केली जाणार आहे
याविषयी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की या वर्षी टंचाई आराखड्याचा समावेश जलजिवन मिशन अंतर्गत करण्यात आला आहे. या द्वारे पाणी योजनांची आणि नळजोडणीची कामे जिल्ह्यात केली जाणार आहे. येत्या दोन वर्षात सर्व कुटुंबाना नळजोडणी देण्याचे उद्दीष्ट असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.