पिंपरी : नायजेरीयातून लेगॉस शहरातून आपल्या भारतीय वंशाची ४४ वर्षीय महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. तिच्या सोबत तीच्या दोन मुली आल्या होत्या. त्यातील एकीचे वय १८ आणि दुसरीचे वय १२ वर्षे आहे. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली होती. त्यात महिलेचा ४५ वर्षीय भाऊ, त्यांची दीड वर्षे, सात वर्षांची दोन मुली अशा सहा जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचा अहवाल मिळाला होता. त्यांच्या संपर्कातील आणखी ४ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळवले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नायजेरियातून २४ नोव्हेंबरला आलेल्या तिघांची तपासणी केली होती. त्यांचे आणि त्यांच्या संपर्कात आलेला एक अशा तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह २९ नोव्हेंबरला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर नायजेरीयावरून आलेल्या एकाचा आणि त्यांच्या संपर्कातील दोघांची तपासणी करण्यात आली. त्यात दिनांक ३० नोव्हेंबरला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यामुळे नायजेरीयातून आलेल्या तीन आणि त्यांच्या संपर्कातील तिन अशा एकूण सहा जणांच्या घशातील द्रवाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंगसाठी पुण्यातील एनआयव्ही येथे पाठविले होते. तत्पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या सहा जणांना पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयात गृहविलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी ४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर दोघांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांच्या संपर्कातील आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पुण्यातील एक ओमायक्रॉन रुग्ण कोरोनामुक्त
पुण्यात फिनलँड येथून आलेल्या रुग्णाचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला होता. कोणतीही लक्षणे नसल्यामुळे तो संस्थात्मक क्वॉरनटाईनमध्ये होता. दहा दिवसानंतर त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोव्हीड रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी खबरदारी म्हणून पुढील सात दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.