चाकण : कंपनीमधील चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी चाकण येथील भंगारमाफिया रशीद शेख याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा भाऊ, साथीदार व कंपनीतील सुपरवायझर यांना चाकण पोलिसांनी अटक केल्याची माहिती पो.नि. संतोष गिरीगोसावी यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशीद छोटूमिया शेख, त्याचा भाऊ हाजीहारुण छोटूमिया शेख, साथीदार फिरोज शेख व महाळुंगे येथील सदगुरू इंजिनिअरिंग कंपनीमधील सुपरवायझर कैलास उत्तम कहाटे अशी आरोपींची नावे आहेत. कहाटेने आरईएमएल हब कंपनीमधील इतर जॉबची चोरी करून २२ हजारांचा चोरीचा माल फिरोज याच्यामार्फत रशीदला विकला होता.
भंगारमाफिया रशीद शेखसह चौघांना अटक
By admin | Published: February 01, 2016 12:42 AM