पुणे - कामशेत येथे दोन वैद्यकीय व्यावसायिक यांच्यात व्यावसायिक वादातून डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणी एका डॉक्टर सह चार जन व इतर अनोळखी तीन ते पाच जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी डॉ. एकनाथ गोपाळघरे यांनी फिर्याद दिली आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवार दि. १४ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पवना नगर फाटा येथे महामार्गालगत असलेल्या कामशेत हॉस्पिटल मध्ये विकास वाटाणे ह्या रुग्णावर उपचार झाल्या नंतर उपचाराचा खर्च देण्यास रुग्ण व त्याच्या नातेवाई यांनी टाळाटाळ केली. तसेच लोणावळा येथील एका नगरसेविकेला बोलावून घेतले. त्यावेळी एवढे जास्त कुठे बिल असते काय, आम्ही डॉ. टाटीया यांच्या कडे चौकशी केली आहे. त्यांनी आम्हाला एवढे बिल नसते असे नगरसेविकेने सांगून दमदाटी करीत अगोदर भरलेले बिलाचे डीपोझीट पैसे वगळून उर्वरित पैसे न भरता रुग्ण घेऊन गेले. डॉ. गोपाळघरे यांनी त्या संबंधी कामशेत पोलिसात धाव घेतली. मात्र याच वेळी तुमच्या बिला बाबत लोणावळा येथील नगरसेविका व स्थानिक डॉक्टरांच्या तक्रारी आल्या असून तुम्ही भेटायला या असे डॉ. प्रशांत टाटीया यांनी त्यांना सांगितले असता त्यांच्या वादावादी झाली व यातून डॉक्टरसह चार जन व इतर अनोळखी तीन ते पाच जणांनी डॉ. एकनाथ गोपाळघरे यांच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांना मारहाण, दमदाटी शिवीगाळ करीत लोखंडी स्टूल ने त्यांच्या नाकावर मारून त्यांना जखमी केले. यात त्यांच्या नाकाचे हाड फ्राक्चार झाले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही केमेराचे डिव्हीआर मशीन घेऊन गेले अशी फिर्याद डॉ. एकनाथ गोपाळघरे यांनी दिली आहे. या प्रकरणी डॉ. प्रशांत टाटीया, चेतन [ पूर्ण नाव माहित नाही ] साई बालगुडे, ज्ञानेश्वर [ ओम साई लब ], संतोष कदम [ ओम साई लब ] आणि तीन ते पाच जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.