लोणावळा : लोणावळा रेल्वे स्थानक परिसर व लोणावळा लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत रेल्वेच्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये आज चौघांचा मृत्यू झाला. या घटना मंगळवारी सकाळी साडेआठ, दुपारी एक, साडेतीन व सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडल्या.
पहिली घटना नांगरगाव येथील मालगाडी यार्डाजवळ घडली़ या ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडताना किशोर सोपान टेमघरे (वय ५०, रा. नांगरगाव लोणावळा) या स्थानिक नागरिकाचा मालगाडीची धडक बसल्याने मृत्यू झाला. दुसरी घटना लोणावळा रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्र. तीनजवळ घडली. या ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडताना राजेंद्र शिवलिंग माने (वय ३४, रा. अंबरनाथ, ठाणे) यांना पुणे लोणावळा लोकलची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. तिसरी घटना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन दरम्यान घडली.या ठिकाणी एका अंदाजे पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटली नसून ते हॉकर्स असावेत असा अंदाज आहे. तर चौथी घटना कोणार्क एक्स्प्रेसमध्ये लोणावळा ते खंडाळा घाटमाथा दरम्यान घडली आहे. या अपघातात दिलीप देवराज स्वाइन (वय ३२, कल्याण, ठाणे) यांचा मृत्यू झाला.रेल्वे मार्ग ओलांडताना नागरिकांनी घ्यावी दक्षता४एकाच दिवशी लोणावळा भागात रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणावळा रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे काम सुरू आहे, तर दुसरा पादचारी पूल दूर असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडावा लागत आहे. नागरिकांनी रेल्वे मार्ग ओलांडताना येणाऱ्या जाणाºया गाड्यांचा अंदाज घेऊन मार्ग ओलांडणे गरजेचे आहे.