बाभुळगाव: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून एकमेकांच्या विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांच्या विचित्र व भिषण अपघातात चारजण जागीच ठार झाले आहेत. इंदापूरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
यामध्ये गणेश पोपटराव गोडसे, अविनाश कुंडलिक पवार व बाळासाहेब साळुंखे सर्व रा. सोलापूर अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर एकाचे अद्याप नाव समजू शकले नाही. ही घटना सोमवार ७ जूनला दुपारी ३:३० च्या सुमारास पूणे सोलापूर हायवे रोड व्यवहारे पेट्रोल पंपानजिक घडली आहे.
इरटीका गाडी सोलापूरहुन पुण्याकडे जात होती. तर बोलेरो ही गाडी पूण्याहुन सोलापूरकडे येत होती. इरटीका गाडीत एक ड्रायव्हर तर एकटाच तर बोलेरो गाडीत ड्रायव्हरसह तीघेजण बसले होते. इरटीका गाडी ही पूणे लेनवरून पूण्याकडे भरधाव वेगात जात असताना व्यवहारे पेट्रोल पंपानजिक तिचा टायर फुटला. गाडी पूणे लेनवरून डिव्हायडर तोडुन सोलापूर लेनवरून जाणार्या बोलेरो गाडीला जोरात धडकली. अशी माहिती मिळाली आहे.