भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील तपास अधिकारी नितीन शिंदे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार संतोष भापकर, अभिजित जाधव व विक्रम सावंत यांना खबर मिळाली मिळाली. कात्रज कोंढवा रस्त्यावर पुलाखाली दोघे जण ॲक्टिवा घेऊन थांबले होते. खबर मिळताच तपास पथकाने घटनास्थळी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांची कसून चौकशी केली असता, तपासात त्यांनी दुचाकीसोबतच कर्नाटकातून टाटा कंपनीचा ट्रक आणि गुजरात पासिंगची तवेरा गाडी चोरल्याची कबुली दिली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार संतोष भापकर, रवींद्र भोसले, अण्णा साहेब माडिवाले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, नीलेश खोमणे, समीर बागशिराज, विक्रम तांबे, अभिजित जाधव व राहुल तांबे यांनी केली.
------------------
फोटो ओळ - भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, तपास पथकातील अधिकाऱ्यांनी ट्रकसह चारचाकी व दुचाकी वाहने चोरणाऱ्यांना अटक केली, सोबत चोरी केलेल्या गाड्या.